Uncategorized
परभणी ते मुंबई रॅली न्याय द्यावा नाहीतर जीव घ्यावा या मागणीने भीम अनुयायी संभाजीनगर च्या दिशेने रवाना
परभणी येथील संविधान विटंबनेबाबत झालेल्या आंदोलनात शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचा कारागृहात मृत्यू झाला व संतोष देशमुख हत्याप्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा व सूर्यवंशी व देशमुख यांना न्याय देण्यात यावा यासाठी आशिष विजय वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली परभणीतील मुंबई या ठिकाणी रॅलीचे आयोजन केले आहे न्याय द्यावा नाहीतर आमचा जीव घ्यावा या मागणीने रॅली पुढे सरकत असून या रॅलीमध्ये बौद्ध अनुयायी व इतर समाजाचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच तृतीय पंचांचाही मोठा सहभाग होता सप्तरंगी सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष विद्या पैळ विकी सोनवणे व इतर यांनी आपण पण समाजाचा एक घटक आहोत या एकोप्याने सर्व समाज बांधवांना पाणी बॉटल चे वाटप करण्यात आले यामुळे समाज बांधवांनी पण त्यांचे आभार मानले
सुनिल कुलकर्णी ✍️