आर्थिक घडामोडी
जालना शहरातून जाणाऱ्या कुंडलिका आणि सीना नदीपात्राचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतलेला पुढाकार
जालना शहरातून जाणाऱ्या कुंडलिका आणि सीना नदीपात्राचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतलेला पुढाकार आता
लोकसहभागाच्या माध्यमातून लोक चळवळ बनत आहे. त्याच लोकसहभागातून रविवार दि. 8 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 7 वाजेपासून सीना नदीपात्राची स्वच्छता करण्यात आली. दरम्यान नदीपात्रात होत असलेल्या अतिक्रमणाची जालना शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी पाहणी केली. नदीपात्रावरील अतिक्रमण हे नदीच्या अस्तित्वावर उठल्याने नदीचे अस्तित्व धोक्यात आल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हटलंय.
इस्राईल शेख
मुख्य संपादक ✍️